Breaking News

शिवरायांना अनोखी मानवंदना; स्वराज्याचे सुराज्य बनवू या..!

पायरीचीवाडीतील विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांची प्रतिज्ञा

पाली : प्रतिनिधी

शिवजयंती निमित्ताने सुधागड तालुक्यातील पायरीचीवाडी येथील प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी बुधवारी ’चला स्वराज्याचे सुराज्य बनवूया, छत्रपतींचे स्वप्न साकार करूया’ अशी प्रतिज्ञा घेत शिवरायांना अनोखी मानवंदना दिली. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक कुणाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पायरीचीवाडी गावात शिवप्रतिमेची पालखी मिरवणूक काढली होती. या वेळी विद्यार्थ्यांनी ’छत्रपती शिवाजी महाराज की जय’,’हर हर महादेव’ अशा घोषणांनी गाव दणाणून सोडले.या वेळी विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी चला स्वराज्याचे सुराज्य बनवूया, छत्रपतींचे स्वप्न साकार करूया अशी प्रतिज्ञा घेतली. दारात आलेल्या पालखीचे पूजन करून ग्रामस्थांनी स्वागत केले.

म्हसळा तालुक्यात शिवजयंती साजरी

म्हसळा : प्रतिनिधी

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बुधवारी म्हसळा तालुक्यांतील विविध शासकीय कार्यालये, प्राथमिक शाळा, हायस्कुल, ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. तहसीलदार कार्यालयात तहसीलदार शरद गोसावी, पी. डी. पागिरे, दत्ता कर्चे, महेश रणदिवे, ऐनकर मॅडम, मोरेश्वर जंगम, पंचायत समिती कार्यालयात सभापती उज्ज्वलाताई सावंत, जिल्हा कृषि व पशुसंवर्धन सभापती बबन मनवे, उपसभापती मधुकर गायकर, माजी सभापती छाया म्हात्रे, विद्यमान सदस्य संदीप चाचले, सतिश शिगवण, किरण पालांडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तालुका सार्वजनिक वाचनालयात  झालेल्या शिवजयंती कार्यक्रमाला अध्यक्ष संजय खांबेटे, सचिव अशोक काते, ग्रंथपाल उदय करडे, सायली चोगले, धनश्री नाक्ती, शक्ती कांडे, तुषार घाडगे, प्रशांत करडे आदी उपस्थित होते.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply