नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
गेटवे टर्मिनल्स इंडिया (जीटीआय) या नावानेही ओळखल्या जाणार्या एपीएम टर्मिनल्स मुंबईने नवीन साप्ताहिक आंतर-आशिया सेवा कार्यान्वित केली आहे. आरडब्ल्यूए1 (आरसीएल फीडर्स चायना-वेस्टर्न इंडिया सर्व्हिस) या नावाने ओळखली जाणारी सेवा आरसीएल फीडर्स, पॅसिफिक इंटरनॅशनल लाईन्स, सीयू लाईन्स आणि इंटर एशिया लाईन्स यांच्यातर्फे आरसीएल फीडर्सच्या बरोबर 35 दिवसांच्या चक्रात पाच व्हेसल्सचा वापर करून संयुक्तपणे कार्यरत आहे. मुंबईमधील टर्मिनलवर 15 नोव्हेंबर रोजी या सेवेतील पहिला मेडन कॉल आला. या साखळीत नान्शा, शेकोऊ, सिंगापूर, वेस्टपोर्ट, नॉर्थपोर्ट, न्हावाशेवा, मुंद्रा, वेस्टपोर्ट, हेफोंग, नान्शा या बंदरांचा समावेश आहे. या नवीन कॉलबद्दल बोलताना जीटीआयचे सीओओ गिरीश अगरवाल म्हणाले, जीटीआय नेहमीच ग्राहक सेवेसाठी अग्रणी राहिली आहे आणि आमच्या बंदराला आशियाशी जोडणार्या सेवेचा एक भाग असल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होत आहे. या सेवेमुळे आमच्या ग्राहकांना त्यांची बाजारपेठ विस्तारण्याची आणि आजवर न पोहोचलेल्या आशियाई देशांशी जोडले जाण्याची संधी मिळेल. आमच्या पायाभूत सुविधा आणि क्षमता यांद्वारे ही सेवा सर्वाधिक सक्षमपणे कार्यान्वित करायला आम्हांला मदत होईल याचा विश्वास वाटतो. त्यामुळे आमच्या ग्राहकांना परवडणार्या वाजवी किंमतीत आणि सुरक्षीत कार्गो वाहतुकीची हमी आम्ही देऊ शकतो.