उरण : वार्ताहर
उरण मध्ये प्रथमच कार आणि बुलेटचे मॉडिफिकेशन असेसरीज शॉप दसर्याच्या शुभमुहूर्तावर बोकडवीरा, उरण पनवेल रोड येथे सुरू झाले असून त्याचे उदघाटन आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. त्यामुळे सर्व प्रकारच्या कारचे लेटेस्ट मॉडीफिकेशन असेसरीज खारघर व वाशीच्या दरात आई एकविरा असेसरीज हब बोकडवीरा, उरण येथे उपलब्ध होणार आहेत. याचा उरणच्या नागरिकांना निश्चित फायदा होणार आहे.
यापूर्वी मॉडिफिकेशनसाठी उरणमधील नागरिकांना खारघर, वाशीला जावे लागत होते. आता मात्र उरणमध्येच नागरिकांना ही सुविधा प्राप्त होणार असल्याने उरणमधील नागरिकांची पैसे व श्रमाची बचत होणार आहे, असे आमदार महेश बालदी उद्घाटनाच्या वेळी म्हणाले. या वेळी आई एकविरा असेसरीज हबचे गिरीश म्हात्रे, महेश जोशी यांना आमदार महेश बालदी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बोकडवीरा ग्रामपंचायतच्या सरपंच मानसी पाटील, सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पाटील, ग्रामसुधारणा मंडळ बोकडवीरा सेक्रेटरी भगवान पाटील, उरण तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष शेखर पाटील, गणपती देवस्थान ट्रस्ट बोकडविराचे विश्वस्त मनोज पाटील, ग्रामसुधारणा मंडळ अध्यक्ष सूर्यकांत पाटील, उरण तालुका भाजप चिटणीस सुनील पाटील, श्री गणेश मित्र मंडळ, फ्रेंड्स फोर एव्हर ग्रुप, फ्रेंडली बॉईज ग्रुपचे पदाधिकारी सदस्य, बोकडवीरा गावचे ग्रामस्थ आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.