Breaking News

नागोठणे ज्येष्ठ नागरिक संघातर्फे शालोपयोगी साहित्याचे वाटप

नागोठणे : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थीच शिकत असल्याने आमची संघटना त्यांना दरवर्षी शालोपयोगी साहित्याचे वाटप करीत असते. या विद्यार्थ्यांच्या अनेक गरजा असून, त्या भागविण्यासाठी येथील बँका तसेच सेवाभावी संघटना, पतसंस्था, नोंदणीकृत मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन नागोठणे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष महादेवसिंग परदेशी यांनी केले.

नागोठणे ज्येष्ठ नागरिक संघाचा पाचवा शालोपयोगी साहित्य वितरण समारंभ सोमवारी (दि. 22) येथील जोगेश्वरी नगरातील प्राथमिक शाळेत पार पडला. त्या वेळी परदेशी बोलत होते. या वेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटपसुद्धा करण्यात आले. संघटनेचा भविष्यात व्याप वाढला तरी या शाळेत दरवर्षी शालेय साहित्य वाटप केले जाईलच, असा विश्वास उल्हास शिंदे यांनी या वेळी व्यक्त केला.

शाळेतील सर्व मुलींना तसेच जातीजमातीच्या निकषात बसणार्‍या मुलांना शासनाकडून गणवेश मिळतात, मात्र खुल्या प्रवर्गातील मुलांना गणवेशापासून वंचित राहावे लागते. येथील सर्वच मुले आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध होण्यासाठी नागोठणे ज्येष्ठ नागरिक संघटनेने प्रयत्न करावा, अशी अपेक्षा  मुख्याध्यापिका वंदना बैकर यांनी आपल्या भाषणात या वेळी व्यक्त केली.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply