आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्वाही; गुणवंतांचा सत्कार
पनवेल ः रामप्रहर वृत्त
तुम्ही सर्व आपापल्या आयुष्यामध्ये पुढे प्रगती करीत राहा. त्या दृष्टिकोनातून वाटचाल करीत असताना आमचे जे सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत राहू, अशी ग्वाही भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथे दिली. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आयोजित विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
शैक्षणिक क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शुक्रवारी (दि. 19) पनवेल येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मंडळाची स्थापना झाल्यापासूनच वह्या वाटप, गणवेश वाटप, शैक्षणिक साहित्याचे वाटप तसेच शिक्षणासाठी आर्थिक मदत यासारखे विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी सहकार्य केले जाते. त्यालाच अनुसरून ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात सर्वोतम कामगिरी केली आहे अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला होता.
सत्कार सोहळ्याला श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष तथा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील तसेच श्यामनाथ पुंडे व अन्य उपस्थित होते.
या वेळी रूपेश दुर्गे, वृषाली फंगाल, जयेश कोळी, सुहास म्हात्रे, आदित्य पुंडे, डॉ. समीर आगलावे, प्रिया आवास्कर, मोहनिश मिस्त्री, अनिकेत बहाडकर, अमन शेख, श्वेता तुपे, पूजा पुगावकर, अश्विन सातपुते, महेश कर्णे, साजन खंडेलवाल, आयेशा खान, मानसी रहाणे, अश्विनी कोळी, गणेश माळी, नितीन माळी, मनोज ठाकूर, डॉ. आदिती फडके, अक्षता गीध या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. काही विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या पालकांनी स्वीकारला.
आग्रा येथे स्पोर्ट्स फिजिकल फिटनेस ऑफ बोर्ड उत्तर प्रदेश व इंडिया युनिव्हर्सिटी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा पैलवान व सीकेटी कॉलेजचे क्रीडा शिक्षक रूपेश पावशे यांनी सुवर्णपदक पटकविले. याबद्दल त्यांचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला.