पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप कोकण प्रदेश विभागीय भटके विमुक्त सेलची रविवारी (दि. 21) भाजप मध्यवर्ती कार्यालयात झाली. या बैठकीला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. या वेळी त्यांचे स्वागत करण्यात आली. बैठकीमध्ये कमिटीच्या रचनेसंदर्भात चर्चा करण्यात आली असून बुथ आघाडीतील सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रदेश संयोजक गोविंद गुंजाळकर, कोकण संयोजक श्रीराम इदाते, उत्तर रायगड संयोजक बबन बारगजे, कोकण सहसंयोजक भास्कर यमगार, भटके विमुक्त आघाडी उपाध्यक्ष अशोक शेळके, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे, धनगर समाज रायगड जिल्हाध्यक्ष आनंदराव कचरे, भटके विमुक्त महिला रायगड जिल्हा अध्यक्षा विद्या तामखडे, कळंबोली अध्यक्ष आबा घुईकडे, संजय सातपुते, रामचंद्र शेळके आदी उपस्थित होते.