कर्जत : बातमीदार
महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी कर्जत तालुक्यातील दहिवली ग्रामपंचायतीने चौदा वित्त आयोगाच्या निधीतून ब्युटी पार्लर प्रशिक्षण सुरू केले आहे. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केलेल्या या दोन दिवशीय ब्युटी पार्लर प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन सरपंच चिंधु तरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच यशवंत भवारे, ग्रामसेवक अरुण राजपूत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य
उपस्थित होते. या शिबिरात दहिवली गावातील 50हुन अधिक महिला प्रशिक्षण घेत आहेत. त्यांना जामखेड येथील श्री समर्थ प्रतिष्ठानेचे अध्यक्ष मोहन साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वैशाली सावंत, शिक्षक रुपाली ग्रावर या फेशर, ब्लिच व्यक्स, अम्ब्रॉ, क्लिनप, हेअरस्टाईल, मेकम, मेहंदी या विषयांवर प्रशिक्षण देत आहेत.