Breaking News

कामोठे 11 मधील समस्या मार्गी; नगरसेविका हेमलता गोवारी यांचा पाठपुरावा

कामोठे : रामप्रहर वृत्त

कामोठे से. 11 मधील सेक्टर 5 व 9 या भागातील विविध नागरी समस्या सोडविण्यात आल्या आहेत. या कामी नगरसेविका हेमलता गोवारी व सामाजिक कार्यकर्ते रवी गोवारी यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यानिमित्त येथील नागरिकांनी गोवारी दाम्पत्याचे जाहीर आभार मानले आहेत. कामोठे शहरातील अतिशय दुर्लक्षित असा भाग म्हणजेच प्रभाग 11 मधील सेक्टर 5 व 9 हा विभाग होय. या विभागात नेहमीच विविध समस्यांना येथील नागरिकांना तोंड द्यावे लागते. त्यातीलच एक ज्वलंत विषय म्हणजेच येथील वर्षानुवर्षे रस्त्यांवर साचणारे व वाहते मलनिस्सारणाचे पाणी. या समस्या नगरसेविका हेमलता  गोवारी व सामाजिक कार्यकर्ते रवी गोवारी यांना नागरिकांनी निदर्शनास आणून दिल्या. त्यानुसार नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने समस्येचे गांभीर्य लक्षात घेत गोवारी दाम्पत्यांनी या समस्येचा प्रशासनाकडे पाठपुरावा केला. अवघ्या तीन ते चार दिवसांत या समस्या मार्गी लावल्या. त्याबद्दल त्यांचा समस्थ व्यापारी व स्थानिक नागरिकांनी त्यांचा सत्कार केला व मनापासून आभार मानले.

Check Also

राम तेरी गंगा मैली @४१ वर्षे; राज कपूरच्या दिग्दर्शनातील शेवटचा चित्रपट

चित्रपटाच्या नावात त्याचं व्यक्तिमत्त्व अथवा ओळख व्हायला हवी. त्यातही दिग्दर्शक दिसतो. राज कपूरच्या दिग्दर्शनातील चित्रपटाचे …

Leave a Reply