Breaking News

बँक खात्यातून 50 हजार गायब; पोलिसांत तक्रार ; नेरळ दहिवली येथील प्रकार

कर्जत : बातमीदार

आयडीबीआय बँकेच्या कोल्हारे (ता. कर्जत) शाखेच्या खातेदाराच्या खात्यामधून दोन दिवसात चक्क 50 हजार रुपये डेबिट झाले आहेत. त्याबद्दल या खातेदाराने नेरळ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे. नेरळ जवळील दहिवली येथील शेतकरी दुर्वास मारुती भोईर यांचे  आयडीबीआय बँकेच्या कोल्हारे शाखेत सेव्हिंग खाते आहे.त्या बँकेचे एटीएम कार्ड दुर्वास भोईर वापरत असून, त्या कार्डावरून 21 जून 2019 रोजी भोईर यांनी नेहा कलेक्शनमध्ये खरेदी केल्यानंतर 3100 रुपयांचे पेमेंट कार्डद्वारे केले. मात्र 23 जून रोजी त्यांनी कोणताही व्यवहार केला नसताना बँकेच्या खात्यातून 25 हजार रुपये काढल्याचा मेसेज मोबाईल फोनवर आला. त्यामुळे  दुर्वास भोईर यांनी 24जून रोजी सकाळी तडक बँकेची शाखा गाठली.तेथे पासबुकवर नोंद केल्यानंतर तर त्यांना आणखी धक्का बसला. कारण 22 जून रोजीदेखील आपल्या बँक खात्यातून 25 हजार रुपये काढल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कस्टमर केअरला फोन केला आणि एटीम कार्ड बंद करून घेतला. आणि बँकेच्या एटीम कार्डद्वारे आपली फसवणूक झाली असल्याची तक्रार दुर्वास भोईर यांनी नेरळ पोलीस ठाण्यात दाखल केली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply