गव्हाण : रामप्रहर वृत्त
विकासकामात अडथळा आणणार्या बेलपाडा येथील रेखा कृष्णा ठाकूर यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी ग्रामस्थ नंदकुमार दामोदर पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. रेखा ठाकूर (रा. बेलपाडा) ही महिला नेहमी आपल्या शेजारील लोकांशी काही ना काही कारणास्तव भांडते. सध्या तिने गव्हाण ग्रामपंचायतमधील सरपंचांसह सर्व सदस्यांच्या बरखास्तीची मागणी जिल्हा सत्र न्यायालयाकडे केली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून, सगळीकडे या घटनेचा निषेध होत आहे. बेलपाडा गावातील नंदकुमार पाटील व इतर लोकांनी सांडपाणी वाहून नेण्यासाठी भूमिगत पाइपलाइन टाकली, जिचा या महिलेच्या जमिनीशी काहीही संबंध नसून तिथे वर्षानुवर्षे रस्ता आहे. त्याच्या खालून पाइपलाइन टाकली असता या महिलेने आक्षेप घेतला आहे, परंतु ती जिथे राहते तिथे बीअर शॉपने या जागेवर अतिक्रमण केले आहे. तिथे स्वत:ची थोडी जमीन असून, आसपासची सर्व जमीन ही रामा सिना ठाकूर, सर्व्हे नं. 327-28मध्ये येते. सदर महिलेच्या अशा सतत गावाच्या विकासात अडथळा निर्माण करण्याच्या वृत्तीला पूर्ण बेलपाडा गाव कंटाळले असून, अशा महिलेवर कायदेशीर कारवाई होणे समाजहिताचे आहे, अशी मागणीही नंदकुमार पाटील यांनी केली आहे.