Breaking News

उरण तालुक्यातील 715 पूरग्रस्तांचे पंचनामे पूर्ण

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यात उद्भवलेल्या पूरस्थितीचे पंचनामे उरण तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले असून तालुक्यातील एकूण 715 घरांचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यामधील सर्वाधिक चिरनेर गावाला पुराचा फटका बसल्याचे दिसून आले आहे.

मागील आठवड्यात मुसळधार पावसाने उरणला झोडपले होते. या मुसळधार पावसामुळे मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेकांच्या घरामध्ये पाणी शिरून अन्नधान्याचे व घरातील जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले होते. त्याची दुसर्‍या दिवशी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्याकडून पाहणी करण्यात आली. त्यानंतर पुरामध्ये नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे तहसील कार्यालयाच्या अंतर्गत असणार्‍या तलाठी कार्यालयामार्फत करण्यात आले आहेत.

तालुक्यातील एकूण 715 पूरग्रस्तांचे पंचनामे करण्यात आले आहेत. यामध्ये चिरनेर गावाला सर्वाधिक पुराचा फटका बसला आहे.  चिरनेरमधील 369 घरामध्ये पाणी गेल्याचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. विंधणे 10, जासई 57, वेश्वी 31, चिर्ले 48, जसखार 149, सवरखार 31, करळ 04, कोप्रोली 03, सोनारी 07, मुळेखंड 01, चाणजे 03, वशेणी 01, सारडे 01 असे तालुक्यातील एकूण 715 घरांचे पंचनामे करण्यात आले असल्याची माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply