Breaking News

वडखळजवळ दोन दुचाकींची धडक; तिघे जखमी

पेण : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ गावच्या हद्दीत  रविवारी (दि. 21) सकाळी एका भरधाव दुचाकीने समोरून येणार्‍या दुसर्‍या दुचाकीला धडक दिली. या अपघातात तीन जण जखमी झाले.

चंद्रकांत कृष्णा बावकर (रा. वेलशेत, ता. रोहा) हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी (एमएच-06,एटी-6427)  घेऊन रविवारी सकाळी 11.15 वाजण्याच्या सुमारास  नागोठणे बाजुकडून डोलघर (ता. पनवेल) येथे जात होते. त्याचवेळी आरोपी (वय 30, रा. इंद्रनगर वडखळ, ता. पेण) हा त्याच्या ताब्यातील दुचाकी (एमएच-06, बीएफ-2693) घेऊन पेण बाजूकडून नागोठणेकडे जात होता. त्याने चंद्रकांत बावकर यांच्या दुचाकीला समोरून जोरात ठोकर दिली. या अपघातात चंद्रकांत बावकर, त्यांची पत्नी व मुलगी यांना किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या. व गाड्यांचेही नुकसान झाले.

 याबाबत वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार रुईकर करीत आहेत.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply