पनवेल : रामप्रहर वृत्त
गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनियर कॉलेजचे उपशिक्षक आणि संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य, तसेच रयत ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक आणि वाशी शाखा चेअरमन प्रमोद कोळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा झाला.
विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला उपप्राचार्य जगन्नाथ जाधव, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, ‘रयत’चे लाईफ वर्कर व समन्वय समिती सदस्य रवींद्र भोईर, रयत सेवक संघाचे रायगड प्रदेशाध्यक्ष नुरा शेख, सांस्कृतिक विभाग प्रमुख ज्योत्स्ना ठाकूर, परीक्षा विभाग प्रमुख चित्राताई पाटील, गुरुकुल प्रमुख संदीप भोईर, क्रीडा विभागप्रमुख जयराम ठाकूर, जुनिअर कॉलेज विभागप्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे, तसेच सर्व अध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रमोद कोळी यांनी या वेळी आपल्या भावना व्यक्त करताना रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व विद्यालयाचे आधारस्तंभ माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत आदींचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सागर रंधवे यांनी केले, तर पर्यवेक्षक दीपक भर्णुके यांनी आभार मानले.