खारघर : रामप्रहर वृत्त
खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागत बास्केटबॉल स्पर्धेचेआयोजन करून करण्यात आले.
तरुण पिढीला विशेषतः विद्यार्थीवर्गाला मैदानी खेळांची आवड निर्माण व्हावी व शरीरस्वास्थ्य तंदुरुस्त रहावे या दृष्टीने खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने 4 व 5 जानेवारी रोजी सेक्टर 19 या खेळाच्या मैदानावर बास्केटबॉल स्पर्धा घेण्यात आली. या आयोजनात ग्रीनस्टार स्पोर्ट्स अकॅडमीदेखील सहभागी झाली होती.
स्पर्धेचे उद्घाटन स्पोर्ट्स फिजिशियन डॉ. अमोल पाटील व इनटॉप टॉवर सोसायटीचे चेअरमन प्रवीण पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. मुलींचे जवळपास 14 व मुलांचे 18 संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. याचे सर्व आयोजन खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या सचिव तथा पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका नेत्रा पाटील आणि अकॅडमीचे अध्यक्ष किरण पाटील यांनी केले होते.
पहिल्या दिवशी मुलींच्या संघांचे खेळ घेण्यात आले. या सामन्यांच्या बक्षीस वितरण समारंभास प्रमुख मान्यवर म्हणून डॉ. डी.वाय. पाटील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राकेश सोमानी व पेस आयआयटी अॅण्ड मेडिकलचे खारघर सेंटर हेड प्रा. डॉ. मुकेश सिन्हा यांच्यासह भाजप उत्तर रायगड जिल्हा सचिव ब्रिजेश पटेल, मी मराठी माझी मराठी मंडळाचे अध्यक्ष कविवर्य कृष्णनाथ कुलकर्णी, भाजप ज्येष्ठ नेते दिलीप जाधव, भरत कोंढाळकर, अॅड. प्रवीण गव्हाणकर, तुषार शेंडे आदी उपस्थित होते.
दुसर्या दिवशी मुलांच्या सामन्यांसाठी माजी खासदार लोकनेते खासदार रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबविणारे किरण पाटील व नेत्रा पाटील यांचे कौतुक केले. या बक्षीस वितरणास प्रमुख पाहुणे म्हणून खारघर भाजप मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, व्यापारी प्रकोष्ट अध्यक्ष अंबाभाई पटेल, युवा मोर्चा खारघर मंडल अध्यक्ष नितेश पाटील, उपाध्यक्ष प्रवीण बेरा, विलास आळेकर, अनंत विचारे, मेघनाथ ठाकूर, प्रा. डॉ. पूजा आगमे आदी उपस्थित होते.
टूर्नामेंटमध्ये मुलींच्या सामन्यांमध्ये 12, 14 व 16 वर्षाच्या आतील संघामध्ये हाय फाय हा संघ विजेता आणि क्रॉस ओव्हर पवई संघ उपविजेता ठरला. मुलांच्या संघामध्ये 12 वर्षाच्या आतील वयोगटात हाय फाय गोरेगावचा संघ विजेता व विबग्योर स्कूलचा संघ उपविजेता ठरला. 14 वर्षाच्या आतील संघामध्ये हाय फाय गोरेगाव विजेता व ग्रीन स्टार स्पोर्ट्स खारघर उपविजेता, तर 16 वर्षाच्या आतील वयोगटात ग्रीन स्टार्स स्पोर्ट्स क्लब सोलापूर विजेता व स्पोर्ट्स स्पिरिट घाटकोपर संघ उपविजेता ठरला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या दिनेश यादव, गोपाल राणा, वैभव शेजवळ, रणजीत पाटील, पृथ्वीराज पाटील, धीरज राजपूत, आदित्य हातगे, ग्रीन स्टार स्पोर्ट्स अकॅडमीचे इम्तियाज बागलकोटे यांच्यासह इतर सहकार्यांनी अथक परिश्रम घेतले.दोन दिवसीय स्पर्धेचे सूत्रसंचालन मोटिवेशनल स्पीकर नवीन खरे यांनी केले.
Check Also
पनवेल महापालिका क्षेत्रातील न्हावाशेवा टप्पा 3 पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण भागांना पाणीपुरवठा करणार्या न्हावाशेवा टप्पा 3 …