Breaking News

टीम इंडियाला मोठा धक्का; न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेतून राहुल ‘आऊट’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

न्यूझीलंडविरुद्ध होणार्‍या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला असून स्टार फलंदाज लोकेश राहुल हा दुखापतीमुळे मालिकेबाहेर झाला. त्याच्या जागी मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवला संघात बदली खेळाडू म्हणून समाविष्ट करण्यात आल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसी आय) ट्विट करून दिली. भारतीय संघाने न्यूझीलंड विरूद्धची टी-20 मालिका 3-0ने जिंकली. पहिल्या दोन सामन्यांत आव्हानाचा पाठलाग करताना, तर तिसर्‍या सामन्यात आव्हानाचा बचाव करताना टीम इंडियाने मालिकेत बाजी मारली. आता न्यूझीलंडविरूद्ध भारतीय संघ दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. यातील पहिला सामना 25 ते 29 नोव्हेंबर आणि दुसरा सामना 3 ते 7 डिसेंबरदरम्यान खेळवला जाणार आहे. संपूर्ण कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माला आणि पहिल्या सामन्यासाठी विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. तशातच आता लोकेश राहुलही दुखापतीमुळे मालिकेबाहेर झाल्याने टीम इंडियासाठी हा मोठा धक्काच मानला जात आहे.

सूर्यकुमार यादवला संधी

भारताचा धडाकेबाज खेळाडू लोकेश राहुल याच्या डाव्या मांडीचे स्नायू दुखावले गेले. त्यामुळे त्याला आगामी भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली. आता तो दक्षिण आफ्रिका दौर्‍याआधी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाऊन योग्य उपचार आणि सराव करेल आणि त्यानंतरच आगामी दौर्‍यासाठी निवडीला पात्र ठरेल. त्याच्या जागी सूर्यकुमार यादवला संधी देण्यात आली आहे. संघ ः अजिंक्य रहाणे (कर्णधार), मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋद्धिमान साहा (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply