Breaking News

विराटसारख्या आक्रमक कर्णधाराची गरज; मदनलाल यांचे मत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करतोय. न्यूझीलंड दौर्‍यात भारतीय संघाला अपयश आलं असले तरीही गेल्या काही वर्षांतील भारतीय संघाचा खेळ पाहता टीम इंडिया सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. महेंद्रसिंह धोनीकडून भारतीय संघाची नेतृत्व विराट कोहलीकडे आली. विराटने आपल्या आक्रमक नेतृत्वशैलीने भारतीय संघाची एक वेगळी ओळख तयार केली आहे. अनेकदा विराटच्या मैदानातील आक्रमक स्वभाव आणि वर्तनावर टीकाही झाली, मात्र भारताचे माजी खेळाडू आणि सध्या क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य मदनलाल यांनी विराटची पाठराखण केली आहे.

विराटने आक्रमकपणा कमी करायला हवा असे लोकांना का वाटते हेच मला समजत नाही. काही वर्षांपूर्वी सर्वांना भारताचे नेतृत्व करायला एक आक्रमक कर्णधार हवा होता आणि आता तिच लोकं विराटला थांबवू पाहत आहेत. तो ज्या पद्धतीने मैदानात खेळतो ते पहायला मला आवडते. सुरुवातीला भारतीय खेळाडूंबद्दल अशी धारणा होती की ते मैदानात आक्रमक नसतात. आता विराटच्या रूपाने भारताला एक चांगला खेळाडू मिळालाय तर लोकं त्यावरही प्रश्नचिन्ह उभे करतायत. आपल्याला विराटसारख्या आक्रमक कर्णधाराची गरज आहे, असे मदनलाल यांनी एका मुलाखतीत म्हटले. जय-पराजय हा खेळाचा एक भाग आहे. न्यूझीलंड दौर्‍यातील पराभव आणि विराटची खालावलेली कामगिरी लक्षात घेतली तरीही सध्याच्या घडीला तो जगातला सर्वोत्तम फलंदाज असल्याचे मदनलाल यांनी नमूद केले. अनेकदा काही तांत्रिक कारणांमुळे तुम्ही तुमचा फॉर्म गमावून बसता, पण मेहनत केली तर त्या गोष्टीही सुधारता येतात. अनेक दिग्गज खेळाडू यामधून गेलेले आहेत, मदनलाल यांनी विराटची बाजू घेतली. सध्या कोरोना विषाणूमुळे बीसीसीआयने सर्व सामने रद्द केले आहेत. त्यामुळे आगामी काळात भारतीय संघ मैदानात कधी उतरतोय याकडे भारतीय चाहते डोळे लावून बसले आहेत.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply