उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
उरण तालुक्यातील ओएनजीसी सीआयएसएफ उरण-मुंबईकडून देशाचा 75वा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आरटीसी बँड पथकानी देश भक्तिपर गीत सादर केली. देशाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ओएनजीसी मुंबई येथील कमांडर ललित शेखर झा व जेएनपीटी बंदराचे कमांडर विष्णु स्वरूप यांनी ओएनजीसी प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणार्या सीआयएसएफच्या जवानांचा व बैंड पथक जवानांचा गौरव केला. या वेळी जेएनपीटी बंदराचे कमांडर विष्णू स्वरूप, उरण सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, उरण ओएनजीसी सिक्युरिटी इंचार्ज वीरेंद्र सिंह, भाजप-शिवसेना युतीच्या ग्रुप ग्रामपंचायत चाणजेचे सरपंच मंगेश थळी, डॉ. सुरेश पाटील, पोलीस निरीक्षक सुहास चौहान आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपनिरीक्षक दिलराज मीणा यांनी केले.