Breaking News

पनवेल तालुक्यात 216 नवीन रुग्ण

191 जणांची कोरोनावर मात

पनवेल ः प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात मंगळवारी (दि. 14) 216 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 191 जणांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत रुग्णांत पुन्हा विक्रमी वाढ झाली आहे. मंगळवारी येथे 175 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 134 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 41 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 57 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले.

 कळंबोलीत 21 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 693, तर कामोठ्यात 29 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 907 झाली आहे. खारघरमध्ये 47 नवीन रुग्ण आढळून तेथील रुग्णसंख्या 813 झाली. नवीन पनवेलमध्ये 21  नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे तेथील रुग्णसंख्या 663 झाली. पनवेलमध्ये 43 नवीन रुग्ण आढळून तेथील रुग्णांची संख्या 842 झाली आहे. तळोजामध्ये 14 नवीन रुग्ण आढळले. आता तेथील रुग्णसंख्या 237 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 4155 रुग्ण झाले असून, 2360 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63.30 टक्के आहे. 1429 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 96 जणांचा मृत्यू झाला आहे.

 पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे 41 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये करंजाडे आठ, उलवे सहा, पाले बुद्रुक चार, बोर्ले, भिंगारवाडी, न्हावे प्रत्येकी दोन, तर वाकडी, वडघर, सुकापूर, सांगुर्ली, सांगडे, पारगाव, पळस्पे, नेरे, नांदगाव, कोपर-गव्हाण, काळोखे, कराडे बुद्रुक, चिखले, बोंडशेत, बामणडोंगरी, आपटे आणि आजीवलीमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply