उरण : नगर परिषद हद्दीतील कुंभारवाडा वॉर्ड न. 4 मधील गटाराच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी (दि. 22) करण्यात आले. आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने व नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहरध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह यांच्या मार्गदर्शनाखाली उरणमध्ये विकास कामे होत आहेत. कुंभारवाडा येथे गटार कामाच्या भूमिपूजनावेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उमेश वैवडे, एकनाथ माने, मनीषा नवले, मोरेश्वर घाग, सुरेंद्र जाधव आदी उपस्थित होते.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …