पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होणारी विकासकामे आणि पक्षाच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध संघटनांचे पदाधिकारी भाजपकडे अकर्षित होत आहे. अशाच प्रकारे कामोठे येथील व्यापारी बांधवांनी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 20) ‘कमळ’ हाती घेतले.
कामोठे येथील व्यापारी बांधवांनी देशाचे कणखर व यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हे सर्व व्यापारी बांधव भाजपच्या व्यापारी प्रकोष्ठामध्ये कार्य करणार आहेत. या पक्षप्रवेश कार्यक्रमास कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘क’चे अध्यक्ष गोपीनाथ भगत, नगरसेवक विजय चिपळेकर, नगरसेविका कुसुम म्हात्रे, पुष्पा कुत्तरवडे, भाजप कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, के. के. म्हात्रे, युवा नेते हॅप्पी सिंग, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, प्रशांत कदम, समीर कदम, भाजप नेते सुशील शर्मा, भाऊ भगत, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, नमो नमो मंचचे संयोजक सत्यप्रकाश सिंग, प्रदेशाध्यक्ष आर. के. दिवाकर, उपाध्यक्ष संतोष शर्मा, प्रवक्ता मनोज मिश्रा, शहर अध्यक्ष प्रवीण मालविया, उपाध्यक्ष भरत पटेल, चिटणीस रवी भाटला यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मान्यवरांनी पक्षप्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
Check Also
विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रांचा अनुभव घ्यावा -लोकनेते रामशेठ ठाकूर
उरण : रामप्रहर वृत्तकर्मवीर अण्णांनी दिलेला शिक्षण आणि संस्कारांचा आदर्श आपल्याला पुढे घेऊन जाणे अत्यंत …
RamPrahar – The Panvel Daily Paper