Breaking News

अनधिकृत बांधकामाविरोधात तांबडी ग्रामस्थ आक्रमक

खोपोली नगरपलिकेला दिला आत्मदहनाचा इशारा

खोपोली : प्रतिनिधी

नगरपालिका हद्दीतील तांबडी या वसाहतीमध्ये नदाफ नावाच्या रहिवाशाने अनधिकृत घराचे बांधकाम सुरू केले आहे. सदरची जागा वहिवाटीची असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी या जागेवरील अनधिकृत बांधकामाला तीव्र विरोध दर्शवित आत्मदहनाचा इशारा दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. खोपोली नगरपालि का हद्दीतील वासरे गावामधील  तांबडी वसाहतीमध्ये नदाप नावाच्या रहिवाशाने नगरपालिकेच्या परवानगीशिवाय घराचे बांधकाम सुरू केले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सदरची जागा वहिवाटीची आहे व या जागेतून सांडपाणी वाहिनी जाते. त्यामुळे त्यांनी या अनधिकृत बांधकामाला विरोध दर्शविला आहे. या बाबत स्थानिकांनी खोपोली नगरपालिका प्रशासनाला निवेदनही दिले होते. त्याची दखल घेत नगरपालिकेच्या नगररचना विभागाने  नदाफ याला 18 नोव्हेंबर रोजी कारवाई करण्याचे पत्र दिले होते. मात्र त्याने या पत्राला केराची टोपली दाखवत बांधकाम सुरू ठेवले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिकांनी पुन्हा नगरपालिका प्रशासनाला पत्र दिले. तर तांबडी वसाहतीमधील रहिवासी अशोक मरियप्पा त्रिकेनुर यांनी तर येत्या आठ दिवसात योग्यती कारवाई झाली नाही तर, नगरपालिका कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे निवेदन सोमवारी (दि. 6) नगरपालिका प्रशासनाला दिले.

बेकायदेशीर बांधकामास आक्षेप घेतल्यानंतर नदाफ याने आम्हाला शिवीगाळ केली, त्याबाबत आम्ही पोलीस ठाण्यातही तक्रार दिली आहे. तसेच मी आत्मदहन करणार असल्याचेही पोलीस ठाण्यात सांगितले आहे. -अशोक मरियप्पा, ग्रामस्थ, तांबडी वसाहत, खोपोली

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply