Breaking News

आपटा आरोग्य केंद्रात रुग्णांची गैरसोय

पनवेल : वार्ताहर

रसायनीजवळच्या आपटा प्राथमिक आरोग्य केंद्रात सायंकाळनंतर डॉक्टर हजर राहत नसल्याने  गोरगरीब रुग्णांना नाहक त्रास होऊन रुग्णांची हेळसांड होत आहे. आपटा प्राथमिक आरोग्य केंद्र हे पनवेल-गोवा, तसेच दांड पेण रस्त्याजवळ असल्याने किरकोळ अपघातातील रुग्णांसाठी सोईस्कर आहे.

रायगड जिल्हा परिषदेचे आपटा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आपटा ग्रामपंचायत हद्दीत अनेक आदिवासी ठाकूर व धनगर समाजाच्या एकूण 13 पेक्षा जास्त वाड्या वस्त्या आहेत. हे एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने या ठिकाणी दिवस-रात्र रुग्ण येत असतात, परंतु सायंकाळनंतर या आरोग्य केंद्रात डॉक्टरसह कर्मचारीही राहत नसल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशात एखाद्या रुग्णाचा जीव गेल्यास जिम्मेदार कोण, असा सवाल नागरिक करीत आहेत.

सोनारवाडी येथील एका महिलेला प्रसूतीसाठी  आपटा आरोग्य केद्रात आणण्यात आले होते, मात्र 6 वाजताच या आरोग्य केंद्रात डॉक्टर व कोणीही कर्मचारी नसल्याचे धक्कादायक चित्र पाहावयास मिळाले. प्रसूतीसाठी या दवाखान्यात महिला डॉक्टर किंवा साधा एक कर्मचारीही उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. त्या महिलेला प्रसूतीसाठी नाईलाजाने शेवटी अलिबाग येथील सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले.

या दवाखान्यात रात्रीच्या डॉक्टर असावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. आपटा आरोग्य केद्रांत रसायनी व आसपासच्या परिसरातील नागरिक, तसेच वाड्या वस्तीतील नागरिक उपचारासाठी येत असतात. या आरोग्य केद्रात याअगोदर दोन डॉक्टर होते. काही महिन्यांपासून एकच महिला डॉक्टर असल्याने या आरोग्य केंद्रात दररोज येणार्‍या रुग्णांची संख्या पाहता दुसर्‍या डॉक्टरची आवश्यकता आहे. रायगड जिल्हा परिषदेने याकडे लक्ष देऊन रात्रीच्या वेळी वस्तीला राहील, असा डॉक्टर देऊन दुर्गम भागातील येणार्‍या रुग्णांवर उपचार करावे, अशी मागणी ग्रामस्थ नागरिकांतून होत आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply