Breaking News

सीकेटी महाविद्यालयात सकाळ-यिन फोरमची स्थापना

पनवेल : रामप्रहर वृत्त

सकाळ वृत्तपत्र समूहाच्या यंग ईन्स्पीरेटर्स नेटवर्कच्या (धखछ) नेतृत्व विकास प्रकल्पांतर्गत महाविद्यालयीन युवक-युवतींमध्ये नेतृत्व गुण विकसित करण्याकरिता जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगु काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, नवीन पनवेल (स्वायत्त) मध्ये सीकेटी यिन फोरमच्या अध्यक्षपदाची निवडणूक उत्साहात झाली. या निवडणुकीमध्ये तृतीय वर्ष माहिती व तंत्रज्ञान विभागाची विद्यार्थिनी स्नेहल नरवडे बहुमताने निवडून आली. ही निवडणूक प्रक्रिया ऑनलाईन माध्यमातून पार पडली. ज्यामध्ये महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष 2021-2022 च्या नोंदणीकृत विद्यार्थ्यांनी मतदाराची भूमिका बजावली.

निवडणुकांचे निकाल रविवारी (दि. 5) जाहीर करण्यात आले. मंगळवारी (दि. 7) महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. एस. के. पाटील यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्षा स्नेहल नरवडे, उपाध्यक्षा नेहा कुलकर्णी, सचिव रचिता मुंबईकर, कार्यकारी मंडळ सदस्य नील जाधव व पूर्णिमा गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी सकाळ-यिनचे प्रादेशिक अधिकारी गणेश गोलप, सीकेटी-यिन फोरमचे समन्वयक प्रा. आकाश पाटील, सह-समन्वयिका प्रा. अपूर्वा ढगे, सांस्कृतिक समन्वयक प्रा. गणेश जगताप व सीकेटी-यिन सदस्य उपस्थित होते. सीकेटी-यिन फोरमच्या नवनिर्वाचित सदस्यांना जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थ्येचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी शुभेच्छा दिल्या.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply