अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्हास्तरीय शुटींग बॉल स्पर्धेत यजमान मॉडेल रांजणखार संघाने विजेतेपद पटकाविले. वीर बहिरीदेव स्पोर्ट्स बहिरीचापाडा संघ उपविजेता ठरला, तर तृतीय क्रमांक ए वन संघ माणकुले व चतुर्थ क्रमांक विद्युत्त मांडवखार संघाने मिळविला. मॉडेल रांजणखार संघाने 62व्या वर्षांत पदार्पण केले असून, सातत्याने स्पर्धा भरवून जिल्ह्यासह राज्यात आदर्श निर्माण केला आहे. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास गव्हर्निंग कौन्सिल मेंबर, महाराष्ट्र राज्य चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीयल अॅण्ड अॅग्रीकल्चरचे सदस्य चंद्रकांत मोकल, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे, संजय पाटील, अशोक नाईक आदी उपस्थित होते. पारितोषिक वितरण अॅड. भालचंद्र पाटील, खारेपाट शुटींगबॉलचे अध्यक्ष शंकर मोकल, कुंदन पाटील, ज्ञानेश्वर म्हात्रे, रमाकांत पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सहसचिव विनायक पाटील आदींच्या उपस्थितीत झाला. या वेळी विजेत्या संघांना पारितोषिक देण्यात आले. त्याचबरोबर उत्कृष्ट खेळाडू स्वप्नील पाटील (बहिरीचापाडा), नेटमन निहाल म्हात्रे (रांजणखार), शुटर राजेश पाटील यांनी उल्लेखनीय खेळी केली. त्यांनाही गौरविण्यात आले.