Breaking News

रायगडातील ओबीसींच्या 21 जागांवरील निवडणुका स्थगित

अलिबाग : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षणाला दिलेल्या स्थगितीच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या एकूण 21 ओबीसी प्रभागांतील निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. आता 6 नगरपंचायतींमध्ये 81  जागांसाठी निवडणूक होणार आहे.

रायगड जिल्ह्यातील खालापूर 1, तळा 4, माणगाव 4, म्हसळा 4, पोलादपूर 4, पाली (नवनिर्मित) 4  अशा   सहा नगरपंचायतींमध्ये एकूण 21 जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी राखीव असून त्यानुसार आरक्षण जाहीर करण्यात आले होते, मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षणाला दिलेल्या स्थगितीच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या एकूण 21 ओबीसी प्रभागांतील निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत.

उर्वरित जागांसाठी ठरलेल्या वेळापत्रकानुसार निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. आता 6 नगरपंचायतींमध्ये 81  जागांसाठी निवडणूक होणार आहे.

6 नगरपंचायतींमध्ये 1 ते 7 डिसेंबर 2021 या कालावधीत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात आली. या नामनिर्देशन पत्रांची बुधवारी (दि. 8) छाननी करण्यात आली. 13 डिसेंबर नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर अवश्यक असल्यास 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होईल 22 डिसेंबर 2021 मतमोजणी होणार आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply