Breaking News

महापालिकेचे वाहनतळ मोकळे

पनवेल : बातमीदार

पनवेल महापालिकेचे वाहनतळ मनपाच्या अतिक्रमणविरोधी विभागाने मोकळे केले आहे. रहदारीच्या ठिकाणी असलेल्या एकमेव वाहनतळात हार, फुले, गजरे विक्रेत्यांनी अतिक्रमण करून बस्तान मांडले होते.

पनवेल शहरात पार्किंगची अवस्था अत्यंत कठीण आहे. छोट्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होणे ही नित्याची बाब झाली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने तत्कालीन नगर परिषदेत मंजूर विकास आराखड्याप्रमाणे रस्ते रुंदीकरण करण्यास सुरुवात केली आहे, मात्र शहरातील बाजापेठेजवळ असलेल्या एकमेव दुचाकी वाहनतळात विक्रेत्यांनी हार, फुले विक्रीसाठी अतिक्रमण केले होते. दुचाकीसाठी असलेल्या एकमेव वाहनतळात या व्यावसायिकांनी राहण्याची व्यवस्था केली होती. सुमारे 20 दुचाकी बसतील एवढीच जागा शिल्लक ठेवून अन्य ठिकाणी चोहोबाजूंनी संसार थाटले होते. जवळ असलेल्या महापालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समधील सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करून वाहनतळातच संसार थाटण्यात आला होता. येथील पाण्याचा वापर व्यवसायासाठी होत असल्यामुळे विक्रेत्यांना कुठे जाण्याची गरज भासत नव्हती. पावसाळा वगळून ही व्यावसायिक कुटुंबे या वाहनतळातच रहात असत. अखेर मंगळवारी (दि. 26) प्रभाग अधिकारी श्रीराम हजारे यांनी या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उचलून वाहनतळ दुचाकीसाठी मोकळे केले. शंभरहून अधिक दुचाकी मावतील इतकी क्षमता असलेल्या वाहनतळात सध्या 20हून अधिक दुचाकी कधी लागत नव्हत्या. यापुढे वाहनतळात कोणालाही अतिक्रमण करू देणार नाही. या अतिक्रमणांवर कायम कारवाई करण्यात येईल, असे हजारे यांनी सांगितले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply