Breaking News

गव्हाण आणि न्हावे परिसरातील पाणी प्रश्नासंदर्भात सिडको भवनमध्ये बैठक

आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनी केली अभियंत्यांशी चर्चा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील गव्हाण आणि न्हावे ग्रामपंचायत हद्दीतील पाणी प्रश्नासंदर्भात गुरुवारी (दि. 9) भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी सिडको भवन येथे अभियंता श्री. मुळे यांच्याशी चर्चा केली.
या बैठकीस पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, सदस्य सागरशेठ ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, कोपर गाव अध्यक्ष सुधीर ठाकूर, किशोर पाटील आदी उपस्थित होते.
या वेळी सिडकोचे अभियंता श्री. मुळे यांनी पुढील 15 दिवसांच्या आत न्हावे व न्हावेखाडी गावासाठी शिवाजीनगर येथून हेटवणे धरणाची नवीन पाईपलाईन टाकून देणार आहोत तसेच जोपर्यंत लाईन टाकून होत नाही तोपर्यंत दिवसाला कमीत कमी चार टँकर पाणी न्हावे ग्रामपंचायतीला देऊ, असे आश्वस्त केले, तर गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील पाणीप्रश्नी स्वतंत्र बैठक घेऊन नियोजन करू, असे सांगितले.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रातील न्हावाशेवा टप्पा 3 पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण भागांना पाणीपुरवठा करणार्‍या न्हावाशेवा टप्पा 3 …

Leave a Reply