रोहे : प्रतिनिधी
एम. बी. मोरे फाउंडेशनच्या रोहे येथील महिला महाविद्यालयाच्या कला शाखेतील विद्यार्थिनींनी नुकताच मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील प्रसिद्ध किल्ला, पुरातन चर्च, खोकरी येथील नबाबकालीन मकबरे यांना भेट दिली आणि आपल्या प्राध्यापकांकडून त्यांचा इतिहासदेखील समजून घेतला.
महिला महाविद्यालयात द्वितीय वर्ष वर्गातील विद्यार्थिनींसाठी शॉर्टटर्म सर्टिफिकेट कोर्स अंतर्गत तासिका, क्षेत्रभेट, प्रात्यक्षिके, प्रकल्प इ. अभ्यासक्रम घेतला जातो. त्याचाच एक भाग म्हणून द्वितीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थिनींनी मुरूड येथील ऐतिहासिक वास्तूंना प्रत्यक्ष भेट दिली. महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. माधुरी जाधव व प्रा. दीपेश भोसले यांनी या भेटीत मुघलकालीन वास्तुकला व त्याबद्दलची माहिती विद्यार्थिनींना दिली. या वेळी महाविद्यालयाच्या प्रा. दर्शना शिंदे, प्रा. विवेका देशमुख, प्रा. हणमंत ढवळे, प्रा. हेमलता पाटील, शिक्षकेतर कर्मचारी पांडुरंग रटाटे, रवींद्र गुडेकर यांच्यासह 43 विद्यार्थिनी उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसन्ना म्हसळकर आणि सर्टिफिकेट कोर्स समिती प्रमुख प्रा. प्रतीक्षा घारगे यांनी या क्षेत्रभेटीचे आयोजन केले होते.