Breaking News

शेतकर्यांनी हमीभाव खरेदी केंद्रात भात विक्री करावी -मोहन शिंदे

पोलादपूर : प्रतिनिधी

शासकीय आधारभूत किंमत हमीभाव योजनेंतर्गत पोलादपूरमधील शेतकर्‍यांनी तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ लि. या संस्थेमध्ये भातविक्री करून हमीभावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे चेअरमन मोहन शिंदे यांनी केले.

पोलादपूर तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघातील आधारभूत भात खरेदी केंद्राचे उद्घाटन चेअरमन मोहन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन अजित कंक, ज्येष्ठ संचालक ढवळे, संचालक गणेश उतेकर, संचालक मनोहर पार्टे, रामदास सकपाळ यांच्यासह तालुक्यातील शेतकरी या वेळी उपस्थित होते. संस्थेचे व्यवस्थापक विजय पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

अ प्रतीच्या भातखरेदीसाठी प्रतीक्विंटल एक हजार 960 आणि ब प्रतीच्या भातखरेदीसाठी प्रतीक्विंटल एक हजार 940 रुपये हमीभाव देण्यात येणार असून तालुक्यातील शेतकर्‍यांनी खरेदी-विक्री संघातील हमीभाव भातखरेदी केंद्रामध्ये संपर्क साधण्याचे आवाहन या वेळी व्यवस्थापक विजय पवार यांनी केले.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply