Breaking News

पनवेलमध्ये प्राणवायू खाटांचा तुटवडा

राज्य शासनाने लक्ष देण्याची मागणी

पनवेल : बातमीदार

पनवेल तालुक्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून बाधितांची संख्या 18 हजारांवर पोहचली असून 401 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या वाढत असताना शहरातील कोरोना रुग्णालयात प्राणवायू व कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या खाटांचा तुडवडा असल्याच्या तक्रारी आहेत. पालिका व महसूल प्रशासनाने प्रयत्न करूनही अतिदक्षता विभागातील प्राणवायू खाटांची संख्या वाढू शकली नाही. या कामी राज्य शासनाने गांभीर्याने विचार करुन दिलासा द्यावा, अशी मागणी पनवेलकर नागरिक करीत आहे.

पनवेलमध्ये दररोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून सद्य:स्थितीत 3696 खाटा उपलब्ध असून यात कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या फक्त 70 खाटा असून आयसीयू खाटांची संख्या 236 तर प्राणवायूयुक्त खाटांची संख्या 847 आहे. सर्वसाधारण खाटा या दोन हजार 613 आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत अत्यावश्यक असलेली यंत्रणा कमी पडत आहे. दररोज किमान तीन ते चार रुग्णांना कृत्रिम श्वसन यंत्रणा कमी पडत आहे.

पनवेलमध्ये 17686 जणांना कोरोनाची लागण झाली असून सध्या 2400 हून अधिक रुग्ण विविध रुग्णालयांत व घरातून उपचार घेत आहेत. पालिकेने व महसूल प्रशासनाने उभारलेल्या कोविड काळजी केंद्रात फरफट होण्यापेक्षा निम्म्याहून अनेकांनी घरातूनच उपचार घेणे पसंत केले आहे. सध्या पनवेलमधील कोरोनाबाधित एमजीएम रुग्णालयात 218, उपजिल्हा रुग्णालयात 114 तर डीवाय पाटील रुग्णालयात 108 रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र येथील खाटांमध्ये प्राणवायू यंत्रांची सुविधा आणि अतिदक्षता विभागातील कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेली खाटांची संख्या अपुरी पडत आहे. पालिकेकडून अजून 100 प्राणवायू असलेल्या खाटांचे नियोजन आहे, मात्र खासगी रुग्णालयांकडून त्याला प्रतिसाद मिळालेला नाही.

पनवेलमध्ये प्राणवायू आणि अतिदक्षता विभागातील कृत्रिम श्वसण यंत्रणा असलेल्या खाटांची संख्या वाढविण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. विविध रुग्णालयांसोबत याबाबत तातडीचा बैठका घेऊन बोलणी सुरू आहे. लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल.

-संजय शिंदे, उपायुक्त, पनवेल पालिका, आरोग्य विभाग

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply