Breaking News

वडघरमधील रस्त्याचे भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीतून वडघर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे. वडघर कॉलेज फाटा परिसर ते वडघर गावाच्या मध्यापर्यंत हा रस्ता तयार होत आहे. या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा सोमवारी (दि. 21) भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाला.

या वेळी पनवेल भाजप महिला मोर्चाच्या पनवेल उपाध्यक्ष समिना साठी, बूथ अध्यक्ष मोहम्मद साठी, के. सी. पाटील, समीर केणी, अस्लम चौगुले, झाकीर पठाण, बशुर खान यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी अरुणशेठ भगत यांनी, आमदार महेश बादी यांच्या माध्यमातून हे काम होत आहे. जोपर्यंत नागरिकांची कामे आमदारांना कळत नाही तोपर्यंत  दखल घेतली जाणार नाही. त्यामुळे आपण आपली कामे करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply