मुंबई : प्रतिनिधी
जबलपूर, मध्य प्रदेश येथे 26 ते 30 डिसेंबरदरम्यान होणार्या 54व्या राष्ट्रीय अंजक्यपद पुरुष-महिला खो-खो स्पर्धेसाठी बुधवारी महाराष्ट्राचे संघ जाहीर करण्यात आले. पुण्याचा सुयश गरगटे आणि प्रियंका इंगळे या स्पर्धेत अनुक्रमे महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाचे नेतृत्व करतील.
सोलापूर येथे झालेल्या राज्य अंजक्यपद स्पर्धेतील कामगिरीद्वारे या संघांची निवड करण्यात आली. बिपीन पाटील आणि महेश पालांडे यांच्याकडे या वर्षीही अनुक्रमे पुरुष आणि महिला संघाच्या प्रशिक्षणाची सूत्रे सोपवण्याचा निर्णय महाराष्ट्र खो-खो संघटनेने घेतला आहे.
संघ – पुरुष : सुयश गरगटे (कर्णधार), प्रतीक वाईकर, ऋषिकेश मुर्चावडे, मिलिंद कुरपे, सागर लेंगरे, अक्षय भांगरे, अनिकेत पोटे, हर्षद हातणकर, अरुण गुणकी, सूरज लांडे, गजानन शेगाळ, राहुल सावंत, लक्ष्मण गवस, अभिषेक पवार, श्रेयस राऊळ.
महिला : प्रियंका इंगळे (कर्णधार), दीपाली राठोड, श्वेता वाघ, स्नेहल जाधव, रूपाली बडे, रेश्मा राठोड, पूजा फरगडे, गौरी शिंदे, अश्विनी शिंदे, जान्हवी पेठे, अपेक्षा सुतार, आरती कांबळे, अंकिता लोहार, पायल पवार, संध्या सुरवसे.