Breaking News

पनवेल, उरण, नवी मुंबईत दत्त जयंती उत्साहात

पनवेल : वार्ताहर

पनवेलच्या गावदेवीपाडा येथे श्री स्वामी समर्थ मठात दत्तजयंती नियमांचे पालन करत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ आरती संग्रह आणि स्वामीच्या पोथीचे प्रकाशन करण्यात आले.

या वेळी श्री स्वामी समर्थ मठाधिपति सुधाकर भाऊ घरत, नगरसेवक अजय बहिरा, पनवेल महापालिकेचे उपायुक्त विठ्ठल डाके, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद ढोले, पोलीस शिपाई धनवट, संवेदना प्रकाशन पुणेचे नितीन हिरवे, पत्रकार संजय कदम, प्रशांत शेडगे आणि असंख्य स्वामी भक्त उपस्थित होते. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वामी समर्थ मठात करण्यात आले होते. काकड आरती, नित्यनैमितिक पूजा प्रसाद, लघूरूद्र, दत्तजन्म सोहळा, दत्तगायत्री होम हवन, श्री स्वामी समर्थ महिला मंडळ यांची भजने त्यानंतर  महा आरती आणि महादेव बुवा शहाबाजकर आणि मंडळी यांची भजने झाली.उत्सवात मोठ्या प्रमाणात स्वामी भक्तांनी सहभाग घेतल्याचे मठाधिपती सुधाकर घरत यांनी सांगितले.

मोहोपाडा : प्रतिनिधी

मोहोपाडा व शिवनगर ग्रामस्थांचे बाजारपेठेत असणार्‍या दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन साध्या पद्धतीने करण्यात आले होते.

पहाटे काकड आरती, सकाळी दत्तमुर्ती अभिषेक करण्यात आले. या वेळी झालेल्या पुजेचा मान पत्रकार राकेश खराडे व रसिका खराडे यांना मिळाला. यानंतर ग्रामस्थांच्या वतीने ज्ञानेश्वरी पारायण, संगीत भजनाचा कार्यक्रम झाला. किशोर लोहार यांचे तबलावादक भजन, श्री दत्त जन्माचे किर्तन हभप वामन महाराज भोईर यांनी केले. हरीपाठ आणि दतगुरूंच्या पालखीची मिरवणूक श्री दत्त मंदिरातून मोहोपाडा गाव तेथून पुन्हा श्री दत्त मंदिर अशी  काढण्यात आली.

या मिरवणुकीत लहानथोर, मोहोपाडा  ग्रामस्थ महिला वर्ग उपस्थित होते.

दरम्यान, मोहोपाडा येथील श्री दत्त मंदिर बाजारपेठेत असल्याने दर्शनासाठी भाविकांची रांग लागल्याचे चित्र पहावयास मिळाले. या वेळी शासकीय नियमांचे पालनही करण्यात आल्याचे दिसून आले.

उरण : वार्ताहर

दत्त जयंतीनिमित्त उरण तालुक्याची यात्रा दरवर्षी असते.कोरोनाचा प्रादुर्भाव होयू नये या करिता दत्त जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. उरण शहरातील देऊळवाडी येथे दत्त मंदिरात दर्शनसाठी आलेल्या भक्तांची चांगल्या प्रकारची सोय करण्यात आली. आमदार महेश बालदी मित्र मंडळ व देऊळवाडी ग्रामस्थ यांच्या वतीने भक्तांना प्रसाद (पार्सल) व एक पाण्याची बाटली देण्यात आली.

आमदार महेश बालदी, आमदार महेश बालदी मित्र मंडळ सर्व सदस्य, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहराध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक राजेश ठाकूर, धनंजय कडवे, नगरसेविका प्रियंका पाटील, शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, रोहित पाटील, हस्तीमल मेहता, हितेश शाह, मनन पटेल, अजित भिंडे, देवूळवाडी ग्रामस्त मंडळचे अध्यक्ष निरंजन नार्वेकर, सुहास जुवेकर, विपुल झुझम, तुषार म्हात्रे, सतीश पुजारी, ओमकार बैरागी, सुनील बैरागी, अभिजित पाटील, दिनेश ठक्कर यांचे सहकार्य लाभले.

केगाव ग्रामपंचायत हददीतील विनायक-कोळीवाडा येथील जगदीश कोळी यांचे एक मुखी दत्त मंदिर, मोरा कोळीवाडा बालई  गावातील दत्त मंदिर येथे, बोरी नाका येथील परेश तेरडे आदी ठिकाणी दत्त जयंती सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला.

नवी मुंबई : प्रतिनिधी

नवयुग पंचपरमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित नेरूळ सेक्टर10 मधील जागृत श्री पंचपरमेश्वर मंदीराचा 24वा वर्धापन दिन आणि दत्त जयंती उत्सव मोठ्या धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला.

या उत्सवात प्रारंभी सकाळी काकड आरती, त्यानंतर हरिपाठ, महाभिषेक सायंकाळी पालखी सोहळ्यात भाविकांनी शिस्तीने दत्तगुरुचे दर्शन घेतले. यावेळी पंचपरमेश्वर महिला भजन मंडळाचे सुश्राव्य भजन होते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून धार्मिक उत्सव अध्यक्ष नवनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेज, टीएनजी कॉलेजचा 100 टक्के निकाल

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी 2024मध्ये घेण्यात …

Leave a Reply