Breaking News

अंधेरी कामगार राज्य विमा रुग्णालय सुरू त्वरीत सुरू करा

भारतीय मजदूर संघाची मागणी

मुंबई :प्रतिनिधी

अंधेरीतील कामगार राज्य विमा रुग्णालयाला 17 डिसेंबर 2018 आग लागली होती. या आगीत 14 रुग्णांचा मृत्यू झाला होता. गेल्या तीन वर्षांपासून हे रुग्णालय बंद असून ते त्वरित सुरू करावे अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली आहे. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळाद्वारे कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांना रिजनल डायरेक्टर मुंबई यांच्याद्वारे देण्यात आले.

रुग्णालय बंद असल्यामुळे कामगारांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. आधीच कामगार राज्य विमा योजनेची सेवा निकृष्ट दर्जाची असल्याबद्दल कामगारांच्या असंख्य तक्रारी आहेत. त्यात हे रुग्णालय तीन वर्षे बंद असल्याने कामगारांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. गेल्या 3 वर्षात हे रुग्णालय सुरू करू न शकल्याने मंडळाची निष्क्रियता स्पष्ट झाली तरी हे रुग्णालय लवकरात लवकर सुरु करावे आणि या रुग्णालयातील आगीबाबत केलेल्या चौकशीचा अहवाल व त्यावर केलेली कार्यवाहीचा तपशील लवकरात लवकर जाहीर करावा, अशी मागणी भारतीय मजदूर संघाने केली आहे.

निवेदना देताना भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल दुमणे, मुंबईचे अध्यक्ष बापू दडस, संदीप कदम, ए. टी. सावंत व उत्कर्षा बिर्जे आदी उपस्थित होते.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply