Breaking News

कर्जत : नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र शेडगे यांची रोहा तालुका पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. नेरळ पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी त्यांना निरोप दिला. रवींद्र शेडगे हे 2017मध्ये नेरळ पोलीस ठाण्यात रुजू झाल्यानंतर पुढे तीन वर्षे यांनी वेगवेगळ्या जबाबदार्‍या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांची रोहा तालुका पोलीस ठाण्यात बदली करण्यात आल्याने त्यांना नेरळ पोलीस ठाण्यातून निरोप देण्यात आला. प्रभारी अधिकारी अविनाश पाटील, उपनिरीक्षक राम शिद, आढाळ यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply