Breaking News

नवी मुंबई महापालिकेतर्फे ऑनलाईन स्पोर्ट्स फेस्टिव्हल

नवी मुंबई ः बातमीदार

सध्याची कोव्हीड प्रभावित परिस्थिती व कोविड प्रतिबंधात्मक नियमावली लक्षात घेता नवी मुंबईकर नागरिकांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण करुन त्यांना प्रोत्साहन देण्याकरिता महापालिका क्रीडा विभागाच्या वतीने अभिनव स्वरुपाच्या ऑनलाईन स्पोर्ट्स फेस्टिव्हल 2021-22चे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धांमध्ये बुद्धिबळ, योग तसेच बॉस्केटबॉल स्किल चॅलेंज, फुटबॉल स्किल चॅलेंज, आणि फिटनेस चॅलेंज अशा विविध ऑनलाईन खेळांचा समावेश आहे. या स्पर्धांची नोंदणी ऑनलाईन होणार आहे. स्पर्धांच्या नोंदणीकरिता महापालिकेच्या वेबसाईटवर  लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या सर्व स्पर्धा 14, 17, 19, 30 आणि खुल्या पुरुष व महिला अशा वयोगटात आयोजित करण्यात येत आहेत. स्पर्धेकरिता नोंदणी करण्याची अंतिम तारीख दि. 5 जानेवारी 2022 रात्री 10 वाजेपर्यंत आहे. स्पर्धा 15 जानेवारी ते 2 फे्ब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन स्वरुपात तसेच प्रत्यक्ष मैदानात घेण्यात येणार आहेत. स्पर्धा दोन टप्प्यांत होणार असून प्रथम ऑनलाईन फेरीत पात्र ठरणार्‍या प्रत्येक खेळनिहाय गटातील 20 खेळाडूंची अंतिम फेरीकरीता निवड करण्यात येऊन त्यांची अंतिम फेरी प्रत्यक्षात मैदानावर घेण्यात येतील.प्रत्येक गटातील अंतिम तीन पुरुष व तीन महिला विजेत्यांना रोख पारितोषिके व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत, तर प्रत्येक सहभागी खेळाडूंना ऑनलाईन सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात येतील.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply