Breaking News

कंटेनर-कारच्या धडकेत एकाचा मृत्यू

पनवेल : बातमीदार

कुंडेवहाळ येथे एका कंटेनरने चार चाकी गाडीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. कंटेनर चालक अपघातानंतर पळून गेला आहे. राहुल खारकर असे अपघातात मृत्यू पावलेल्याचे नाव आहे.

राहुल खारकर हा मारुती रिट्स गाडी (क्र. एमएच 46 एडी 9775) घेऊन घरी जाण्यासाठी डी पॉइंटकडून गव्हाण फाट्याकडे जाण्यासाठी निघाला होता. या वेळी कातकरवाडी जवळ कुंडेवहाळ येथे आला असता पाठीमागून येणार्‍या कंटेनरने त्याच्या गाडीला धडक दिली. यात त्याची गाडी पलटी झाली. त्यामध्ये राहुल जखमी होऊन बेशुद्ध पडला होता. त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात त्याचा मृत्यू झाला आहे. कंटेनर चालकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिलांसाठी ऑनलाइन मार्गदर्शन

उरण : स्तन कर्करोग निवारण दिनानिमित्ताने उरण महिला सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, लायन्स इंटरनॅशनल क्लब, उत्कर्ष महिला समिती समविचारी बेरोजगार महिला संघटना, लायन्स क्लब ऑफ उलवे जेन्स यांच्या संयुक्त विद्यामाने मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे असा कार्यक्रम आयोजित करण्यात झाला. टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे बाल कर्करोग तज्ञ डॉ. त्रिलोकी मिश्रा यांच्या सहयोगाने टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या स्त्री कर्करोग तज्ञ डॉ. रिचा बंसलजी यांनी महिलांच्या अनेक समस्यांचे निवारणही केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply