Breaking News

आजपासून किशोर गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा

मुंबई ः प्रतिनिधी

यजमान परभणी विरुद्ध नांदेड आणि गतविजेता ठाणे विरुद्ध सोलापूर यांच्यात किशोर, तर गतविजेते मुंबई उपनगर विरुद्ध पालघर आणि परभणी विरुद्ध लातूर यांच्यात किशोरी गटातील सामन्याने 32व्या किशोर गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेला सोमवार (दि. 20)पासून प्रारंभ होईल. ही स्पर्धा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या अधिपत्याखाली परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या साई क्रीडा मंडळ-खेडूला यांच्या सहकार्याने 20 ते 22 डिसेंबर या कालावधीत खेळविण्यात येणार आहे. गेली जवळपास दोन वर्षे कोरोनामुळे खीळ बसलेल्या कबड्डी स्पर्धेला यामुळे पुन्हा एकदा नवी झळाळी मिळणार आहे. या स्पर्धेत सर्व म्हणजे 25 जिल्ह्यांच्या मुलांच्या, तर 22 जिल्ह्यांच्या मुलींच्या संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे. स्पर्धा प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने सकाळ व सायंकाळ अशा दोन्ही सत्रात खेळविण्यात येईल. परभणीच्या पाथरी येथील जायकवाडी वसाहतीतील कबड्डीमहर्षी बुवा साळवी क्रीडानगरीतयेथे होणार्‍या या स्पर्धेकरिता चार मातीची क्रीडांगणे तयार करण्यात आली आहेत. कोरोना नियमांचे पालन करून स्पर्धा खेळविण्यात येणार आहे. गतवेळी झालेल्या या स्पर्धेत मुलांमध्ये ठाणे विजयी आणि पुणे उपविजेते ठरले होते, तर मुलींच्या विभागात मुंबई उपनगर विजेते आणि यजमान परभणी उपविजेते ठरले होते. मुलांच्या गटात सहभागी झालेल्या संघाची आठ गटांत, तर मुलींच्या गटात सहभागी झालेल्या संघाची सात गटांत विभागणी करण्यात आली आहे.

 

किशोर गट विभागणी

अ गट : ठाणे, सातारा, सोलापूर.

ब गट : पुणे, सिंधुदुर्ग, पालघर.

क गट : परभणी, नांदेड, जालना.

ड  गट : मुंबई उपनगर, नंदुरबार, लातूर

इ  गट : कोल्हापूर, औरंगाबाद, उस्मानाबाद.

फ गट : अहमदनगर, सांगली, बीड.

ग  गट : रायगड, मुंबई शहर, नाशिक.

ह गट : रत्नागिरी, जळगाव, हिंगोली, धुळे.

किशोरी गट विभागणी

अ गट : मुंबई उपनगर, औरंगाबाद, पालघर.

ब गट : परभणी, मुंबई शहर, लातूर.

क गट : रायगड, सोलापूर, धुळे.

ड  गट : कोल्हापूर, सातारा, अहमदनगर.

इ गट  : ठाणे, रत्नागिरी, जळगाव.

फ गट : सिंधुदुर्ग, नाशिक, हिंगोली.

ग  गट : पुणे, सांगली, उस्मानाबाद, बीड.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply