Breaking News

साई एकविरा प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील नाण्याचा माळ येथील विद्यार्थ्यांना श्री साई एकविरा ट्रस्ट यांच्याकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगराळ परिसरातील अतिदुर्गम भागातील रायगड जिल्हा परिषदेच्या नाण्याचा माळ शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी ठाणे येथील साई एकविरा प्रतिष्ठानमधील अर्णव पाटील यांच्या माध्यमातून चंद्रकांत म्हात्रे, मंगेश भोईर, कमलेश साटम, उत्तम फुलोरे, रोशन केणी आणि प्रसाद कदम यांनी शाळेसाठी व विद्यार्थ्यांना उपयोगी अशा साहित्याचे वाटप केले.

नाण्याचा माळ येथे इयत्ता पहिली ते चौथीचे एकूण 17 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील शिक्षक रूपेश मोरे आणि सतीश सोनवणे यांच्या विनंतीनुसार साई एकविरा प्रतिष्ठानमधील सर्व सदस्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply