मुंबई ः प्रतिनिधी
कोरोनासोबतच ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी ही माहिती दिली.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. अशातच ओमायक्रॉनचेही रूग्ण वाढू लागले आहेत. वाढत्या फैलावामुळे मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान, नववी ते बारावीच्या शाळा आणि महाविद्यालये लसीकरणासाठी खुली ठेवण्यात येतील, असे आयुक्त चहल यांनी सांगितले.
Check Also
करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींचे भक्कम पाठबळ!
मच्छीमार बांधवांचे हित आणि उरणच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य ः आमदार महेश बालदी उरण : रामप्रहर …
RamPrahar – The Panvel Daily Paper