पनवेल : बातमीदार
प्रभाग 18 चे कार्यतत्पर नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील हे नेहमीच विकासकामे आणि नावीन्यपूर्ण उपक्रम यासाठी कार्यरत असतात. प्रभागातील काही महत्त्वपूर्ण विकासकामांचा लोकार्पण सोहळा ठाणा नाका रोड येथे झाला. ठाणा नाका रोड वरील काही सोसायट्यांना जाणार्या रस्त्यावर स्ट्रीट लाईटची संख्या कमी असल्यामुळे या भागात थोडासा अंधार पडत होता. यामुळे रहदारीस त्रास होत होता. या परिसरातील सोसायट्यांच्या नागरिकांनी हा विषय कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडे मांडला. विक्रांत पाटील यांनी तत्काळ या विषयात लक्ष घालून आपल्या नगरसेवक निधीमधून येथे 5 स्ट्रीट लाईटची तरतूद करून घेतली आणि त्याचे लोकार्पण करण्यात आले. आपली मागणी लवकरात लवकर पूर्ण करून दिली त्याबद्दल रहिवाशांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांचे आभार मानले आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.