पेण : रामप्रहर वृत्त
येथील साहित्यिक वैभव धनावडे यांच्या अक्षरबंध हायकू संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ गीतकार अरुण म्हात्रे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे, कवी पत्रकार दुर्गेश सोनार यांच्या हस्ते 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे झाले. या वेळी कवी श्रीकांत पेटकर, रवींद्र सोनावणे, वैभव चौगुले, सीमा पाटील, संगीता थोरात, जिविता पाटील, अनघा सोनखासकर, मंजुळ चौधरी आदी उपस्थित होते. यापूर्वी वैभव धनावडे यांचा ‘माझा एकटेपणा’ हा चारोळीसंग्रह प्रकाशित असून लवकरच ‘गोष्ट तुझी माझी’ हा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. पुस्तक प्रकाशनाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.