Breaking News

पोलिसांच्या सतर्कतेसह जनजागृतीचेे कौतुक

पनवेल : वार्ताहर – कोविड 19 कोरोना विषाणू या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव पनवेल शहर परिसरात वाढण्याची शक्यता निर्माण झाली असताना पनवेल शहर पोलिसांनी सतर्कतेने केलेल्या विविध जनजागृती उपक्रमाचे तसेच नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यामानाने पनवेल महानगरपालिकेने तसेच तहसील कार्यालयाने वरिष्ठांकडून आलेल्या आदेशानुसार नियोजन करणे गरजेचे असतानाही पनवेल शहर पोलिसांच्या कामगारीच्या दृष्टीने ते कमी पडल्याची चर्चा पनवेल परिसरात होत आहे.

या रोगाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे, पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, पोलीस निरीक्षक विजय तायडे व त्यांचे सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी गेल्या 22 दिवसांमध्ये अहोरात्र मेहनत घेतली. शहरात कमीत कमी वाहने फिरावी, गर्दी टाळावी, मार्केट यार्डमध्ये पहाटेच्या वेळेस माल उतरवून घ्यावा त्यासाठी त्यांना आखून दिलेला चौकोन तसेच प्रत्येक दुकानासमोर लावण्यात आलेली रश्शी व चौकोन तसेच नागरिकांनी कमीत कमी वेळा घराबाहेर पडावे, असे त्यांच्यामार्फत केलेले आवाहन नागरिकांमध्ये पोलिसांचा धाक रहावा यासाठी केलेले संचलन, त्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळून सायंकाळी 5 नंतर ते सकाळी 8 वाजेपर्यंत लोकांना बाहेर फिरण्याास करण्यात आलेली मनाई, शहरात नाकाबंदी, पळस्पे फाटा येथे वाहनांची तपासणी त्याद्वारे चोरुन प्रवास करणार्‍या नागरिकांना महानगरपालिकेने उभारलेल्या निवारा संकुलात त्यांची केलेली रवानगी तसेच पायी चालणार्‍यांवर सुद्धा निवारा संकुलात केलेली व्यवस्था, पोलिसांच्या माध्यमातून हजारो नागरिकांना जेवण, नाश्ता, पाणी व धान्याचे वाटप, बेकायदेशीररित्या दारु विक्री करणार्‍यांवर केलेली कडक कारवाई या सर्व कारवायांमुळे व नियोजनामुळे पनवेलमध्ये हा रोग फैलाव न होण्यासाठी मोठी मदत झाली आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply