Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
गोरगरीबांचे आधारवड माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे वाढदिवसानिमित्त रविवारी (दि. 2) सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर व हितचिंतकांनी अभीष्टचिंतन केले.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, पुत्र आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, स्नुषा वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, नातू अमोघ ठाकूर, आदेश ठाकूर, अपूर्व ठाकूर, आदित्य ठाकूर आदी कुटुंबीय उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांना आमदार महेश बालदी, माजी आमदार देवेंद्र साटम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे ज्येेष्ठ नेते वाय.टी. देशमुख, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन ठाकरे, माजी पं.स.सदस्य रत्नप्रभा घरत, निलेश पाटील, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, चारुशीला घरत, सीताताई पाटील, माजी नगरसेवक अमर पाटील, निलेश बाविस्कर, हरेश केणी, बबन मुकादम, मनोहर म्हात्रे, डॉ. अरुणकुमार भगत, अ‍ॅड. मनोज भुजबळ, अजय बहिरा, समीर ठाकूर, विजय चिपळेकर, विकास घरत, डॉ. अरुणकुमार भगत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, वृषाली वाघमारे, कुसुम म्हात्रे, जयंत पगडे, भूपेंद्र पाटील, दशरथ म्हात्रे, आनंद ढवळे, प्रकाश बिनेदार, कृष्णाशेठ ठाकूर, अरुण घरत, ब्रिजेश पटेल, प्रल्हाद केणी, अनेश ढवळे, कामगार नेते जितेंद्र घरत, अमित जाधव, हर्षवर्धन पाटील, विद्या तामखडे, मंगेश शेलार, प्रदीप भगत, प्रकाश पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या.
दानशूर, कर्तृत्ववान व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हितचिंतकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचबरोबर त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या वतीने ’एक कृतार्थ संध्याकाळ’ या साहित्यिक कार्यक्रमांतर्गत पनवेलमध्ये कविसंमेलन, सन्मान पुरस्कार व सत्कार सोहळा, कोशिश फाउंडेशनच्या वतीने ओएनजीसी गेट समोर वृक्षारोपण, खारघर स्पोर्ट्स अकॅडमी व युवा प्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने खारघरमध्ये फर्स्ट टॉप रँकिंग ओपन रोड रोलर स्केटिंग, उत्कर्ष सांस्कृतिक, कला आणि क्रीडा मंडळ व आम्ही रक्तदाते संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन पनवेल येथे रक्तदान शिबीर, हार्मनी फाउंडेशन आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पोशीर येथे मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि चष्मे वाटप शिबिर अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Check Also

कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या निरंजन डावखरे यांचा अर्ज दाखल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने विद्यमान आमदार …

Leave a Reply