Breaking News

पनवेल मनपा क्षेत्रात कोरोनाचे नियम पुन्हा कडक; नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रात्रीची जमावबंदी

पनवेल  : प्रतिनिधी

कोरोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचा धोका वाढला असल्याने पालिका क्षेत्रात कोरोनाचे नियम पुन्हा कडक करण्यात आले आहे, तसेच राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार नाताळ सण साधेपणाने साजरा करण्याच्या सूचना आयुक्त गणेश देशमुख यांनी दिल्या आहेत. नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रात्रीची जमावबंदी घोषित करण्यात आली आहे. राज्यात सर्वत्र ओमायक्रॉन रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत असल्याने महानगरपालिका क्षेत्रात खबरदारीच्या दृष्टीने उपाययोजना करण्याबाबतीत आयुक्तांनी शुक्रवारी (दि. 24) बैठक घेतली. उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, चारी प्रभाग अधिकारी यांच्यासह इतर पालिका अधिकारी या वेळी उपस्थित होते. कोरोनाचे रुग्ण ज्या सोसोयटीत आढळतील त्या इमारतीमधील सर्व नागरिकांच्या चाचण्या करणे, तो भाग कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करणे, तसेच लसीकरणावर भर देण्यासाठी दुसर्‍या डोसचे लसीकरण पूर्ण करण्याच्या दृष्टीने वैद्यकिय विभागाच्या टीमबरोबर प्रभाग अधिकार्‍यांनी सहकार्य करणाच्या सूचना आयुक्तांनी प्रभाग अधिकार्‍यांना दिल्या.  नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल्समध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त गर्दी असेल, तर अशा हॉटेल्सवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असलेल्यांनाच हॉटेलमध्ये प्रवेश देणे बंधनकारक राहील. बाजारपेठा, शहरातील मुख्य रस्ते, वाईन शॉप, गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष ठेवणे, तसेच रात्री जमावबंदी आदेशाची अंमलबजावणी कडक करण्याच्या सूचना प्रभाग अधिकार्‍यांना आयुक्तांनी दिल्या आहेत. लग्न व इतर समारंभाही 50 टक्के क्षमतेने करणे व समारंभासाठी आलेल्या सर्व नागरिकांचे दोन्ही डोसचे लसीकरण केलेले असणे व त्याची शहानिशा आयोजकांनी करणे बंधनकारक राहणार आहे. याची माहिती महापालिकेला देणेही बंधनकारक असणार आहे. अन्यथा अशा कार्यक्रमांच्या आयोजकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

नो मास्क नो एन्ट्री!

स्वच्छता मार्शलचे मास्क परिधान न करणार्‍यांवर लक्ष महापालिकेच्या वतीने ‘नो मास्क नो एन्ट्री’ धोरण सर्वत्र कडक राबविण्यात येणार आहे. स्वच्छता मार्शल मास्क न परिधान करणार्‍यांवर लक्ष ठेवणार आहेत. मास्क परिधान न करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना या मार्शल्सना देण्यात येणार आहेत. असे मार्शल्स चारही प्रभाग समितीमध्ये तैनात करण्यात येणार आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply