Breaking News

प्रमोद भगत यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त

सुकापूर येथील भाजपचे युवा नेते प्रमोद भगत यांचा वाढदिवस शुक्रवारी (दि. 24) सामाजिक उपक्रम राबवत साजरा झाला. वाढदिवसानिमित्त अन्नदान करण्यात आले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रमोद भगत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भाजप सुकापूर यांच्या वतीने स्व. मधुशेठ विठ्ठल भगत यांच्या स्मरणार्थ महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी अन्नछत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार सुकापूर येथील भाजपचे युवा नेते प्रमोद भगत यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान करण्यात आले. या वेळी प्रमोद भगत यांना वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपचे तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, प्रभाग समिती ब सभापती समीर ठाकूर, नगरसेविका राजेश्री वावेकर, विकास तळेकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply