लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन; मेडरीका क्लिनिकचे उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त
ज्या सुख सुविधा मुंबईमध्ये मिळणार नाही त्या सुविधा विषेश करून आरोग्याच्या बाबतीतील सुविधा उलवे नोडमध्ये मिळण्यास सुरुवात झाली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 31) उलवे नोड येथे केले. ते उलवे नोड येथील मेडरीका ह्या कॉस्मेटीक रिकन्स्ट्रक्टीव्ह गायनेकोलॉजी अॅण्ड लेझर सेंटर आणि हार्ट, लंग अॅण्ड वस्क्युलर क्लिनिकच्या उद्घाटनाच्या वेळी बोलत होते.
उलवे नोड परिसरात वाढत्या नागरीकरणामुळे अनेक नवनवीन उद्योग या परिसरात सुरू होत आहे. त्यानुसार उलवे नोड सेक्टर 5 मध्ये डॉ. कमलसिंग जूंत्तून आणि डॉ. चांदणी खरात यांनी मेडरीका’ हे कॉस्मेटीक रिकन्स्ट्रक्टीव्ह गायनेकोलॉजी अॅण्ड लेझर सेंटर आणि हार्ट, लंग अॅण्ड वस्क्युलर क्लिनिक सुरू केले आहे. या सेंटर आणि क्लिनिकचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की, ज्या सुख सुविधा मुंबईमध्ये मिळणार नाही त्या सुविधा विषेश करून आरोग्याच्या बाबतीतील सुविधा उलवे नोडमध्ये मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे डॉ. कमलसिंग जूंत्तून आणि डॉ. चांदणी खरात यांना मेडरीका हे सेंटर आणि क्लिनिक सुरू केले आहे. त्याबद्दल अभिनंदन व पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा. तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास आम्ही सर्वतोपरी मदत करू असे आश्वासनही दिले.
या कार्यक्रमाच्या वेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, कोपर अध्यक्ष सुधीर ठाकूर, ज्येष्ठ नेते वसंतशेठ पाटील, अनंताशेठ ठाकूर, किशोर पाटील, सरचिटणीस अंकुश ठाकूर, रविशेठ पाटील आदी उपस्थित होते.