Breaking News

खाडेपाड्याची शाळा झाली वातानुकूलित

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील खाडेपाडा गावातील प्राथमिक शाळा वातानुकूलित झाली आहे. यानिमित्ताने रायगडमधील जिल्हा परिषदेची वातानुकूलित आणि वायफाय शाळा म्हणून खाडेपाडा शाळेचा गौरव झाला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार्‍या आपल्या मुलांची प्रगती झाली पाहिजे म्हणून खाडेपाडा ग्रामस्थांनी गावातील प्राथमिक शाळेला एक संगणक भेट दिला. त्यानंतर ग्रामस्थांनी शाळेला वायफाय सेवा उपलब्ध करून दिली. शाळेचे शिक्षक संतोष नाटीकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना संगणक हाताळण्याचे प्रशिक्षण दिल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे हात संगणकावर सहज फिरू लागले आहेत. बाहेरील धूळ आणि उष्ण हवामानाचा त्रास एलईडी प्रोजेक्टरना होऊ नये याकरिता ग्रामस्थांची मदत घेऊन एक वर्गखोली वातानुकूलित करण्याचा निर्णय शाळेने घेतला. ही कल्पना पालक तसेच ग्रामस्थांना आवडली. त्यांनी वातानुकूलित वर्गखोली उभारण्यासाठी आर्थिक भार उचलला. त्यामुळे वातानुकूलित शाळेतून वायफाय सेवेद्वारे थेट जगाशी संपर्क साधण्याचा या शाळेचा प्रयत्न यशस्वी झाला असून विद्यार्थी स्काइप आणि फेसबुक मेसेंजरद्वारे थेट संपर्क करू लागले आहेत. खाडेपाडा येथील वातानुकूलित शाळेतून विद्यार्थ्यांनी एका ई-पुस्तकाच्या लेखिका अंजली अत्रे यांच्याशी थेट ई-संवाद साधला. या वेळी तब्बल एक तास हे सर्व विद्यार्थी अंजली अत्रे यांच्याकडून माहिती घेऊन त्या विषयाचे संबंधित प्रश्न विचारत होते. असा प्रयोग करणार्‍या शाळेचे परिसरात कौतुक होत आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply