पुणे : विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) वतीने राज्यव्यापी काळे विधेयक होळी आंदोलन करण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली विधेयकाची होळी करण्यात आली.
हा आंदोलनाचा पहिला टप्पा असून आता या पुढे या आंदोलनाची मालिका चालवली जाणार आहे. यावेळी प्रदेश महामंत्री सुशील मेंगडे, उपाध्यक्ष अनुप मोरे, प्रदेश सचिव अमृत मारणे, सुजित थिटे, गणेश कुटे, पुणे शहर सरचिटणीस प्रतीक देसरडा, सुनील मिश्रा, दीपक पवार, राजू परदेशी आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.