खोपोली : प्रतिनिधी
प्राणघातक हत्यारे घेऊन दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगडच्या पथकाने गुरुवारी (दि.14) पहाटेच्या सुमारास खोपोलीत जेरबंद केले. आठ दरोडेखोरांपैकी सहा जणांना पकडण्यात आले असून दोघे जण फरार झाले आहेत.
खोपोली हद्दीत विहारी येथील बंद असलेल्या इंडिया स्टील कारखान्याच्या संरक्षक भिंतीजवळ दरोडेखोर दबा धरून बसले होते. गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगडचे सहाय्यक निरीक्षक नागेश कदम आणि पथकाला संशय आल्याने हटकले असता दरोडेखोर पळून जाऊ लागले.
या वेळी पोलिसांनी पाठलाग करून अरबज तबारक हुसेन शेख (वय 24 रा. वडाळा, मुंबई), मेहबूब उस्मान खान (वय 33), राधेश्याम ब्रिजलाल वर्मा (33), सुग्रीव गुरुप्रसाद गौतम (25), घनश्याम शालिग्राम यादव (वय 33), यकुब बकरसुल्ला चौधरी (वय 25, सर्व रा. ताकई, पो.साजगाव ता.खालापुर मुळ रा. गौराभारी, उत्तर प्रदेश) यांना अटक केली, तर दोघे जण अंधारात फरार झाले. पकडलेल्या दरोडेखोरांकडून देशी बनावटीचे पिस्टल, पितळी राऊंड, लोखंडी रॉड, चाकू, मिरची पूड व नायलॉन रस्सी अशी प्राणघातक हत्यारे मिळून आली.
Check Also
पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …